कागणी येथील कबड्डी स्पर्धेत कालकुंद्री संघ विजेता - चंदगड लाईव्ह न्युज

13 February 2021

कागणी येथील कबड्डी स्पर्धेत कालकुंद्री संघ विजेता

 

कागणी स्पर्धेत विजेता ठरलेला कालकुंद्री कबड्डी संघ.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

जय हनुमान स्पोर्ट क्लब कागणी, ता. चंदगड आयोजित इयत्ता दहावी खालील कबड्डी स्पर्धेत कालकुंद्री संघाने विजेतेपद पटकावले. आज शनिवार दि. १३ रोजी व्ही के चव्हाण-पाटील हायस्कूल कागणी च्या मैदानावर संपन्न झालेल्या स्पर्धेत परिसरातील १२ तगड्या संघानी सहभाग घेतला होता. अटीतटीच्या अंतिम लढतीत कालकुंद्री संघाने कागणी संघावर ११ गुणांनी निर्विवाद विजय मिळवत विजेतेपद पटकावले. विजेत्या संघात मुरारी शंकर पाटील, गौतम विठोबा कांबळे, समीर खताल मोमीन, सुनील आनंद पाटील, आदर्श धोंडिबा गोंधळी, आदित्य श्रीकांत पाटील, श्रीशांत संभाजी पाटील, आदर्श अरुण जोशी, प्रशांत दिलीप कांबळे, यांच्यासह तेजस शिवाजी पाटील, विराज विलास पाटील, लव नारायण कांबळे या खेळाडूंनी भाग घेतला. उत्कृष्ट चढाईपटू गौतम कांबळे तर उत्कृष्ट बचावपटूचा मानकरी मुरारी पाटील ठरला. कालकुंद्री ग्रामस्थांच्यावतीने विजेत्या संघाचे अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment