कोजिमा कडून कोवाड येथे कोविड धनादेशाचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

13 February 2021

कोजिमा कडून कोवाड येथे कोविड धनादेशाचे वाटप

 

कर्तव्य बजावताना कोरोना बाधित झालेल्या सभासदाना कोविड धनादेश देताना मान्यवर.

कोवाड- सी .एल. वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादीत कोल्हापूर शाखा ,कोवाड ( ता. चंदगड ) यांचे मार्फत कर्तव्य बजावताना कोविड बाधीत झालेल्या संस्थेच्या सभासदाना कोविड धनादेशाचे वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री राम हायस्कूल व व्ही पी . देसाई ज्यू . कॉलेज कोवाडचे प्राचार्य वाय . व्ही . कांबळे होते.

शाखा चेअरमन सदाशीव देसाई यांनी प्रास्ताविक केले तर राघवेंद्र इनामदार , विठ्ठल मोहिते, मारुती जाधव. यांनी मनोगते व्यक्त केली . कोजिमा नेहमीच सभासदांच्या पाठीशी आहे ,संकटाच्या काळी सभासदांच्या मागे मदतीचा हात देण्यासाठी सदैव कोजिमा पाठीशी असल्याचे विचार विठ्ठल मोहिते यानी व्यक्त केले . याप्रसंगी कोरोना काळात कर्तव्य बजावताना कोजिमा चे सभासद शिक्षक कोरोना बाधित झाले होते त्या सर्वाना प्रत्येकी पाच हजारांचा धनादेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला .

 या कार्यक्रमाला मनोहर भुजबळ, विवेक पाचवडेकर , टी .एल. तेरणीकर , मुख्याध्यापक एम .बी. पाटील, गणपती पाटील, शिवाजीराव शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. आभार अनंत भोगन यांनी मानले.
No comments:

Post a Comment