व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे महिलांशी गैरवर्तणूक करणाऱ्याला महिलांकडून चोप, चंदगड पोलिसांत गुन्हा नोंद - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2021

व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे महिलांशी गैरवर्तणूक करणाऱ्याला महिलांकडून चोप, चंदगड पोलिसांत गुन्हा नोंद



चंदगड / प्रतिनिधी

       व्हॉट्सॲप ग्रुप काढुन महिलांशी गैरवर्तणूक करणाऱ्या सतीश शिवाजी जेलूगडेकर (रा. हाजगोळी ता. चंदगड) याला महिलांनी चोप देऊन चंदगड पोलीसात गुन्हा नोंद केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या  शिवछत्रपती प्रतिष्ठान संस्थेच्या पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा यांनी चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

         संशयित आरोपी सतीश जेलूगडेकर याने `शिवकन्या वाघीण` ग्रुप या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यात तक्रारदार महिला यांना ॲड करून सदर ग्रुपचा व्हिडिओ तयार करण्याकरिता सौ. घारे यांच्याकडे त्यांचे फोटो मागितले. म्हणून तक्रारदार घारे या ग्रुप मधून लेफ्ट झाल्या. त्या गोष्टीचा मनात राग धरून संशयिताने  दिनांक १३ फेब्रुवारी रोजी यातील साक्षीदार निखिल नंदकुमार माने यांचा मोबाईल वरून फोन करून आत्महत्या करणार अशी धमकी दिली. म्हणून तक्रारदार व साक्षीदार हे संशयिताच्या याच्या घरी गेले असता, त्याने तक्रारदार व साक्षीदार यांना तुम्ही माझे ग्रुपमध्ये पुन्हा ॲड व्हा. नाही तर मी स्वतःचे बरे वाईट करून तुम्हाला अडकविणार अशी धमकी दिल्याने यातील तक्रारदार यांनी चंदगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


No comments:

Post a Comment