चंदगड येथे न. भु. ज्युनियर कॉलेजमध्ये वनसंवर्धन, रक्षण व वन-वणवा सप्ताह निमित्ताने मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

06 February 2021

चंदगड येथे न. भु. ज्युनियर कॉलेजमध्ये वनसंवर्धन, रक्षण व वन-वणवा सप्ताह निमित्ताने मार्गदर्शन

वन-वणवा सप्ताह निमित्ताने चंदगड येथे मार्गदर्शन करताना वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे व इतर

चंदगड / प्रतिनिधी

         चंदगड वनक्षेत्राचे वतीने १ ते ७ फेब्रुवारी या प्रतिबंधक सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील गावांमध्ये जनजागृती सुरू आहे. यामध्ये वन कर्मचारी यांचेकडून शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना व त्याचे दुष्परिणाम तसेच जैवविविधतेचे महत्त्व पटवून देत आहेत. दिनांक ६ फेब्रुवारी शनिवार रोजी याच अनुषंगाने चंदगड येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे चंदगड वनपरिक्षेत्रचे कडून वनवास सप्ताह जन जागृती कार्यक्रम करण्यात आला. 

        या कार्यक्रमाप्रसंगी वनक्षेत्रपाल चंदगड डी. जी. राक्षे म्हणाले, ``वणव्याचे महत्त्व पश्चिम घाट सह्याद्री डोंगर रांगा मध्ये असलेली जैविक विविधता विविध प्रकारचे पशुपक्षी वन प्राणी यांचा आदिवास याविषयी माहिती देऊन वनांना लावण्यात येणाऱ्या आगीमुळे होणारे निसर्ग संपत्तीचे नुकसान नष्ट होणारी जैवविविधता व त्यामुळे होणारे निसर्गचक्रातील दुष्परिणाम या बाबींची माहिती सांगून वन सृष्टीचे सौरक्षण रक्षण करणे.  या बाबतची आपली प्रत्येकाची जबाबदारी असून भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करण्याचे कर्तव्य हे प्रत्येकाचेच असल्याबाबत मत व्यक्त केली. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१ `अ` मूलभूत कर्तव्यामध्ये नैसर्गिक पर्यावरण, वने, सरोवर, नदी व इतर वन्यजीव यांचे संवर्धन करून रक्षण करावे, त्याचबरोबर प्राणी मात्रांच्या प्रति दया भाव ठेवावा. ही बाब नमूद असून आपण सर्वजण मिळून या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करावे. आपले कर्तव्य पार पाडू या अशी अपेक्षा व्यक्त केली.

         याच कार्यक्रम प्रसंगी वाघोत्रेचे वनरक्षक पि. व्ही. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना वनातील औषधी वनस्पती रानमेवा याविषयी माहिती देऊन वन प्राण्यांचा अधिवास नष्ट झाल्याने त्याचे होणारे परिणाम वनस आग लागण्याची कारणे, ती रोखण्यासाठी वन विभागामार्फत करण्यात येणारे प्रयत्न याविषयी माहिती देऊन वन आत प्रवेश करणे आग वणवा लावणे हे भारतीय वन कायदा १९२७ नुसार गुन्हा असल्याबाबतचे सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. आय. पाटील, प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल व न. भू. पाटील जुनियर कॉलेज यांनी आपले मनोगत व्यक्त करताना निसर्ग संपत्तीची जपणूक करून तिचे संरक्षण करणे व संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचेच व मानवाचे अस्तित्वासाठी आवश्यक असले बाबत मत व्यक्त केले.

    कार्यक्रमास ए. जी. बोकडे, उपप्राचार्य अनिल वाजे, दयानंद पाटील, राजू पाटील, वनपाल चंदगड वनविभाग तसेच कैलास सानप, खंडू कानवडे, कोळी वनरक्षक चंदगड वन विभाग आणि वनमजूर नितिन नाईक हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. वि. कानूरकर यांनी केले. आभार व्ही. बी. गावडे कार्यक्रमाचे संयोजन करण्यासाठी ग्रंथपाल शरद हदगल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे शेवट वनविभागाकडून शाळेचे मुख्याध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.



No comments:

Post a Comment