नेसरी येथे किरासू आर्टचे रविवारी अनावरण, डॉक्टर सुर्यवंशीनी जोपासली आगळी वेगळी कला - चंदगड लाईव्ह न्युज

06 February 2021

नेसरी येथे किरासू आर्टचे रविवारी अनावरण, डॉक्टर सुर्यवंशीनी जोपासली आगळी वेगळी कला

डॉ. किरण विठ्ठल सुर्यवंशी

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

         नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे उद्या रविवार दि. ७ रोजी डॉ. किरण विठ्ठल सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आगळ्या वेगळ्या किरासू आर्टचा अनावरण समारंभ संपन्न होत आहे.

      व्यवसायाने डॉक्टर असूनही डॉ. किरण यानी चित्रकलेची तेही निसर्गाशी संबधीत किरासू आर्टची आगळी-वेगळी कला जोपासली आहे. निसर्गातील झाडांची गळून पडलेली पाणे हीच या कलेचे प्रेरणास्थान आहे. कोणताही कृत्रिम रंग, ब्रश न वापरता पुर्नतः नैसर्गिक कलाकृती साकारल्या आहेत. या कलाकृतीचे वैश्विक दालन, किरासू आर्ट लोगो, संगीतमम दृकश्राव्य रचना, वेबसाईट, ३६० फोटोग्राफी इत्यादी माध्यमातून सर्वासाठी खुले व्हावे यासाठी याचा अनावरण सोहळा संपन्न होत आहे. निसर्गासंदर्भात आभार व्यक्त करून ही आगळी वेगळी कला सर्वसामान्य पाहता व  जतन करता यावी यासाठी हा प्रयत्न असल्याचे डॉ. किरण सुर्यवंशी यानी सी. एल. न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.






No comments:

Post a Comment