कोवाड येथे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १५ वाहनांवर पोलिसांकडून कारवाई, सी. एल. न्युजच्या बातमीचा परिणाम - चंदगड लाईव्ह न्युज

06 February 2021

कोवाड येथे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १५ वाहनांवर पोलिसांकडून कारवाई, सी. एल. न्युजच्या बातमीचा परिणाम

कोवाड (ता. चंदगड) येथे बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली.

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा (संजय पाटील )

     दिवसागणिक गंभीर होत चाललेल्या चंदगड तालुक्यातील कोवाड येथील वाहतुकीच्या प्रश्नाबाबत सी. एल. न्युज ने आठवडा बाजार दिवशीचा ग्राउंड रिपोर्ट गुरुवारी प्रसिद्ध केला होता. या न्यूजची दखल घेत चंदगडचे पी आय बी. ए. तळेकर यांनी कोवाडमध्ये बेशिस्त वाहनधारकावर कारवाई केली.

     येथे वाढती रहदारी, बेशिस्त चालविण्यात येणारी वाहने आणि चुकीच्या पद्धतीने रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या दुचाकी. चारचाकी वाहनांचे पार्किंग, अशा सर्व परिस्थितीत कोवाड बाजारपेठेत तासनतास वाहने ही एकाच ठिकाणी अडकून वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असताना दिसत आहे.

      सी. एल. न्युजच्या बातमीची दखल घेत लागलीच चंदगडचे पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक आज सकाळी कोवाड मध्ये दाखल होऊन विना लायसन्स, विना इन्शुरन्स अशा १५ दुचाकी गाड्यावर  कारवाई  करण्यात आली.

     यावेळी पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर म्हणाले की, वाहतुकीबाबत प्रबोधन होणं गरजेचं असून वाहनधारकांनी आपल्या वाहनांची सर्व कागदपत्रे वाहन चालवताना स्वतः जवळ बाळगणे अत्यावश्यक आहे. वाहन चालवताना मोबाईलवर न बोलणे, टीब्बल सीट वाहन न चालविणे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे हे देखील तितकंच गरजेचं आहे. अन्यथा प्रत्यक्ष कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला. आजची कारवाई ही सुरुवात असून यापुढे चारचाकी वाहनावर देखील लक्ष केंद्रित करणार आहे. वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळले तरच वाहतुकीचा प्रश्न भविष्यात सुटणार असल्याचे यावेळी सी. एल. न्युजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. यावेळी प्रत्यक्ष कारवाई वेळी पोलीस कॉन्स्टेबल कुशाल शिंदे, कोवाडचे एम. पी. चव्हाण व अमर सायेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment