कालकुंद्री येथील सरस्वती विद्यालयाच्या प्रथम पाटील याची महाराष्ट्र क्रॉसकंट्री संघात निवड - चंदगड लाईव्ह न्युज

01 February 2021

कालकुंद्री येथील सरस्वती विद्यालयाच्या प्रथम पाटील याची महाराष्ट्र क्रॉसकंट्री संघात निवड

पुणे येथील स्पर्धेत यश मिळवल्यानंतर पदक व प्रमाणपत्रासह प्रथम पाटील


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा               

        श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री शाळेतील इयत्ता नववीचा विद्यार्थी प्रथम पांडुरंग पाटील  याने पूणे जिल्हा अँथेलिटीक्स असोसिएशन पूणे मार्फत घेण्यात आलेल्या दोन हजार मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याची क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. 

        खेळाचे कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबात कोणतेही सुखसुविधा नसताना केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या  या अभूतपूर्व यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. निवडीनंतर विद्यालय व ज्युनि. कॉलेजचे प्राचार्य व्ही.जी. तुपारे यांनी त्याचे अभिनंदन केले. त्याला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक डी.एम तेऊरवाडकर , एन.जे. बाचूळकर व श्री.ई.एल पाटील यांचे मार्गदर्शन तर संदीप पाटील, निशांत पाटील , वडील पांडूरंग पाटील, मामा अनिल दळवी, शाळेतील सर्व शिक्षक व  कर्मचाऱ्यांचे त्याला सहकार्य लाभले. 

No comments:

Post a Comment