शिक्षक बँकेकडून कोरोनामुळे मयत सभासदांच्या वारसांना धनादेश वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

01 February 2021

शिक्षक बँकेकडून कोरोनामुळे मयत सभासदांच्या वारसांना धनादेश वाटप

श्रीमती मंगल नौकुडकर यांना धनादेश देताना संचालक शिवाजी पाटील व रमेश हुद्दार सोबत मान्यवर व बँक कर्मचारी


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर या शिक्षकांच्या अग्रगण्य बँकेकडून सभासदांच्या वारसांना मयत सभासद कल्याण निधीतून २५ लाखापर्यंत चे संपूर्ण कर्ज माफ करून कुटुंबाला एक लाखाची आपत्कालीन भरीव आर्थिक मदत केली जाते.

      सभासद हिताच्या अनेक योजना यशस्वीपणे राबवणारी बँक असा  बँकेचा लौकिक आहे. यंदा कोरोनामुळे हलकर्णी, ता. चंदगड शाखेचे सभासद संजय कल्लापा नौकुडकर, माणगाव (अध्यापक विद्यामंदिर गुडेवाडी) व सुभाष रूक्माण्णा देसाई, कलिवडे (अध्यापक विद्यामंदिर जंगमहट्टी) यांचे वारस अनुक्रमे मंगल संजय नौकुडकर व अश्विनी सुभाष देसाई यांना बँकचे संचालक शिवाजी शंकर पाटील व माजी चेअरमन रमेश हुद्दार यांच्या हस्ते धनादेश शाखा हलकर्णी येथे देण्यात आले. यावेळी दस्तगीर उस्ताद, सदानंद पाटील, अशोक नौकुडकर, नंदकुमार होनगेकर, महादेव संबरेकर, श्रीकांत वै. पाटील, सुशांत नौकुडकर, प्रभू कागणकर, विनोद कोरवी, अशोक भोईटे, टी जे पाटील, भरमू तारीहाळकर, अनंत मोटर, परशराम नाईक शाखाधिकारी जयसिंग देसाई, सुनील पाटील, विलास बेनके, नीलम रेडेकर, प्रदीप पालेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन सदानंद पाटील यांनी केले. आभार अशोक नौकुडकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment