तेऊरवाडीच्या विकासासाठी प्रयत्नशील - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

01 February 2021

तेऊरवाडीच्या विकासासाठी प्रयत्नशील - आमदार राजेश पाटील

तेऊरवाडी येथे रस्त्याचे उदघाटन करताना आमदार राजेश पाटील सोबत अशोक पाटील, प्रा. गुरूनाथ पाटील व इतर

तेऊरवाडी /सी. एल. वृत्तसेवा

    कोरडवाहू गाव म्हणून तेऊरवाडीची शासनाकडे नोंद आहे . असे असले तरीही यापूर्वी कै. नरसिंगराव पाटील यानी पीण्याच्या पाणी योजनेसह जवळपास एक कोटीची कामे दिली होती . अजूनही येथे शेती पाणी प्रश्न व जंगली गव्यांचा उपद्रव असल्याने यासाठी तेऊरवाडीला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी दिले.

        तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथे नवीन वसाहतीतील आमदार फंडातून मंजूर झालेल्या रत्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार राजेश पाटील बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती सुगंधा कुंभार होत्या . तर प्रमूख पाहूणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील , एस .एल. पाटील उपस्थित होते .

       आमदार पाटील पुढे बोलताना म्हणाले , सर्वानी विकासाला साथ देणे गरजेचे असते . विकासासाठी कोणतेही राजकारण  न आणता आम्हाला हात घ्या आम्ही तुम्हाला साथ देतो . विकासामध्ये आम्ही कमी पडणार नाही . तालूक्यात शिवाजी विद्यापिठाच्या उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागत आसून पाटणे फाटा येथील आरोग्य केंद्राचा प्रश्नही लवकरच सुटेल . गवी तसेच हत्तींच्या उपद्रवासंदर्भात वनविभागाला सुचना दिल्या आहेत . तेऊरवाडीतील शेतीसाठी घटप्रभा नदि वरून पाणी आणण्यासाठी अशोक पाटील प्रयत्न करत आहेत . या शेती पाण्यासाठी माझ्याकडून सर्व सहकार्य केले जाईल असेही आमदार राजेश पाटील यानी सांगीतले. आंतरराष्ट्रीय स्तरावर कब्बड्डी स्पर्धात प्रथम क्रमांक मिळवलेल्या विनोद पाटील यांचा आमदार पाटील यानी गौरव केला .

       यावेळी उपसरपंच सौ . शालन पाटील  सदस्य राजेंद्र भिंगुडे, बजरंग पाटील , सुनिल पाटील, सौ . संगीता पाटील यांच्यासह प्रा . गुरूनाथ पाटील ,दत्तात्रय पाटील , मारूती पाटील , एन.व्ही. पाटील , नरसू पाटील , विजय पाटील , विष्णू आढाव, राकेश पाटील , सुबराव पाटील , केदारी पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 


No comments:

Post a Comment