चंदगड - तिलारी रस्त्यासाठी नागरिकांचे हेरे येथे रास्ता रोको आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

01 February 2021

चंदगड - तिलारी रस्त्यासाठी नागरिकांचे हेरे येथे रास्ता रोको आंदोलन

आंदोलक नागरीकांशी चर्चा करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी.

चंदगड / प्रतिनिधी 

            चंदगड-तिलारी या रस्त्याचे रुंदीकरण, व डांबरीकरण करावे या मागणीसाठी  हेरे (ता. चंदगड) येथे पंचक्रोशीतील नागरिकानी रास्ता रोको आंदोलन केले. चंदगड-तिलारी रस्ता हा पारगड व तिलारी पर्यटन स्थळांना जोडणारा  रस्ता असल्याने तो त्वरेने पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

हेरे ता चंदगड येथे चंदगड- तिलारी रस्ता डांबरीकरण व रुंदीकरण करावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करताना नागरीक 

        हेरेचे सरपंच पंकज तेलंग यांच्या नेतृत्त्वाखाली बस स्टॉप वर परिसरातील सरपंच, उपसरपंचासंह नागरिक मोठ्या संख्येने  या आंदोलनात सहभागी झाले होते. या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी सभापती अँड अनंत कांबळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी येथे भेट देऊन या मार्गासाठी प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन नागरिकांनी स्थगित केले. यावेळी ह सुधाकर गावडे ( पार्ले) , अंकुश गवस (कळसगादे) , महादेव गावडे (मोटणवाडी) , राजु पाटील (सावर्डे), श्री. जांबरेकर (उपसरपंच सावर्डे) , तुकाराम धुरी (सरपंच गुडवळे), बंडु पाटील (सावर्डे) , विशाल बल्लाळ , शंकर चव्हाण ( माजी सरपंच हेरे), आप्पाजी गावडे (उपसरपंच हेरे ), चंद्रकांत पाटकर, योगेश बल्लाळ , विवेक पाटील, सचिन वाघराळी, मोहन पाटील,विजय पाटकरसह पंचक्रोशितील नागरिक व व्यापारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment