किणी येथे रस्ता काँक्रीटीकरणचा आमदार राजेश पाटील यांचे हस्ते शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

01 February 2021

किणी येथे रस्ता काँक्रीटीकरणचा आमदार राजेश पाटील यांचे हस्ते शुभारंभ

किणी ता चंदगड येथे रस्ता काँक्रीटीकरणचा प्रारंभ करताना आमदार राजेश पाटील, प्रकाश पुजारी,परशराम हुंदलेवाडकर ,नंदू नांदूडकर ,बाळकृष्ण गणाचारी आदी,


कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

           किणी (ता. चंदगड) येथे आमदार फंडातून रस्ता काँक्रीटीकरण साठी मंजूर झालेल्या कामाचा शुभारंभ आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाला.

       कार्यक्रम प्रसंगी विरुपौक्ष किणीकर यांनी प्रास्ताविक केले.प्रकाश पूजारी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. गावातील चर्च समोरील रस्ता काँक्रीटीकरण व तलाव सुशोभीकरन प्रस्तावाचा पाठपुरावा करनार असल्याचे यावेळी आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.

        यावेळी माजी उपसरपंच परशराम हुंदळेवाडकर, सदस्य यल्लप्पा तरवाळ, पोलीस पाटील रणजित गणाचारी, एस. एल. पाटील, नंदू नांदूडकर ,बाळकृष्ण गणाचारी,पुंडलिक नौकुडकर ,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष जॉन लोबो,शाहु फर्नाडिस ,प्रल्हाद बिर्जे, नरसु मोटुरे,संजय कुट्रे,नागोजी जोशीलकर,शंकर तरवाळ, पुंडलिक नांदूडकर ,लक्ष्मण जोशीलकर, बबन तरवाळ, विष्णु गवंडी ,सूर्याजी कुंभार,मारुती भिम्बर,प्रवीण पुजारी,सुबराव गणाचारी,प्रकाश जोशीलकर , कॉन्ट्रॅक्टर आर एस गावडे (मोदगा)व ग्रामस्थ उपस्थित होते.सदर कामाचा प्रारंभ झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



फोटो - किणी ता चंदगड येथे रस्ता काँक्रीटीकरणचा प्रारंभ करताना आमदार राजेश पाटील, प्रकाश पुजारी,परशराम हुंदलेवाडकर ,नंदू नांदूडकर ,बाळकृष्ण गणाचारी आदी,


No comments:

Post a Comment