![]() |
| अविनाश पाटील |
चंदगड : प्रतिनिधी
हलकर्णी फाटा येथे झालेल्या अपघातात धुमडेवाडी येथील अविनाश तुकाराम पाटील ( वय ५० ) यांचा मृत्यू झाला.
अविनाश हे हलकर्णी फाटा येथून चालत जात असताना पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना गडहिंग्लज येथिल खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.


No comments:
Post a Comment