कानूर बुद्रुक येथे गोवा बनावटीची दारू जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

17 March 2021

कानूर बुद्रुक येथे गोवा बनावटीची दारू जप्त

 


चंदगड / प्रतिनिधी 

     कानूर बुद्रूक (ता. चंदगड) येथील धनगरवाड्यावरील रहिवासी भागोजी तानाजी शेळके (वय वर्षे ३३)याच्या कडून गोवा बनावटीची ७५२०रूपये किमतीच्या ४८ बाॅटल दारूसह ४१८१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

    भागोजी याने काल आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एम. एच. ०७-वी-४४८७) या गाडीवरून मॅकडाॅल कंपनीची गोवा बनावटीची ४७ बाॅटल दारू पोत्यामध्थे बांधून विना परवाना वहातूक करताना बेळगाव-वेगूर्ला महामार्गावर पूंद्रा गावाजवळ सापळा रचून पकडले. त्याच्याकडून ७५२०ची दारू, ८७९५ रूपये रोख, एक मोबाईल, २५०००रूपयांची गाडी असा ४१८१५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.No comments:

Post a Comment