माणगाव (ता. चंदगड) येथे सौ. सूमन बाळू अर्जूनवाडकर व बाळू यमाजी अर्जूनवाडकर या पती, पत्नीला बेकायदेशीर कल्याण मटका घेताना चंदगड पोलिसांनी कारवाई करून ८०० रोख रक्कम जप्त केली.
सूमन अर्जूनवाडकर या आपले पती बाळू यांच्या सांगण्यावरुन घराच्या बाजूस असलेल्या बोळात कल्याण मटका घेताना घेताना चंदगड पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यावेळी सूमन यांनी कारवाईच्या भितीने मटक्याचे आकडे लिहीलेले कागद खरकाट्या बादलीत टाकून पूरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा आणल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोहेकाॅ महेश बांबळे करत आहेत.
No comments:
Post a Comment