डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र वतीने कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकारिणी जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

17 March 2021

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र वतीने कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकारिणी जाहीर

चंदगड / प्रतिनिधी

       डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य पातळीवरील संघटनेची ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी मुंबई येथे स्थापना केली असून या संघटनेची कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकारिणी नुकतीच त्यांनी जाहीर केली.

    यामध्ये कोल्हापूर शहर अध्यक्षपदी प्रशांत चुयेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी विजय पोवार, उपाध्यक्षपदी ताज मुल्लाणी यांची निवड घोषित केली. याशिवाय कोल्हापूर शहर सचिवपदी मदन अहिरे, कोषाध्यक्षपदी उत्तम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणी सदस्यांसह पदाधिकार्‍यांच्या निवडीची पत्रे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद मोरे यांनी प्रदान केली. जिल्हा कार्यकारणी मध्ये सहसचिव समाधान म्हातुगडे, सदस्य असलम शानेदिवाण, अनुराधा सरनाईक-कदम, चेतन शेरेगार, साक्षी दळवी यांची निवड करण्यात आली आहे.



No comments:

Post a Comment