भोगोली येथे वनव्यवस्थापन योजनेतुन एल. पी. जी. गॅस कनेक्शनचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

17 March 2021

भोगोली येथे वनव्यवस्थापन योजनेतुन एल. पी. जी. गॅस कनेक्शनचे वाटप

 

चंदगड वनपरिक्षेत्रामार्फत भोगोली (ता. चंदगड) येथील १२८ कुटुबांनावनव्यवस्थापन योजनेतुन एल. पी. जी. गॅस कनेक्शनचे वाटप करताना आमदार राजेश पाटील, वनक्षेत्रपाल चंदगड डी. जी. राक्षे व इतर.   

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड वनपरिक्षेत्रामार्फत भोगोली (ता. चंदगड) येथील १२८ कुटुबांना सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ मधील अनुदानातुन संयुक्त वनव्यवस्थापन योजनेतुन एल. पी. जी. गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यावेळी चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील प्रमुख उपस्थित होते. 

       यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील म्हणाले, ``चंदगड तालुक्याला लाभलेली निर्गस संपत्तीची देणगी जतन करण्याचे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ती टिकवण्यासाठी वनविभागास सहकार्य करणे, जंगलाला आगी लावू नये, वृक्षतोड होऊ नये, वन्यप्राण्यांची शिकारी होणार नाही यासाठी गाव पातळीवर दक्ष राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शासन पातळीवर राबविण्यात येणाऱ्या अशा योजनांचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊन आपली गावे समृध्द करावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.``

        वनक्षेत्रपाल चंदगड डी. जी. राक्षे यांनी ``एल.पी.जी. गॅस योजनेची सविस्तर माहिती देऊन वनांचे महत्व, वन्यप्राण्याचं आदिवास स्थान, जंगल संपत्तीचे मानवासाठी असलेले विविध फायदे समजावून सांगुन ग्रामस्थांचे सहभागातुन निसर्ग संपत्तीचे जतन व संवर्धन करणे. तसेच स्थानिक नागरीकांचे वनावरील असलेले अवलंबित्वत कमी करुन त्यांच्या राहणीमानात सुधारणा करणे, रोजगाराची उपलब्धता करणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.`` 

      गॅस वाटप लाभार्थीना एचपी गैस एजन्सीचे अभिजीत देसाई यांनी चुलीमुळे होणाऱ्या धुराने त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम तसेच गॅस वापराचे महत्व त्यांची सुरक्षित वापराची पध्दत या बाबतची माहिती दिली. यावेळी कानुर खुर्द वनपाल अनिल वाजे, भोगोली वनरक्षक ए. डी. सांगळे, सरपंच सौ. शितल रामा गावडे,  उपसरपंच अनिल गावडे, ग्रामसेवक विकास मोटे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन संजय गावडे, श्री. शेळके यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थापन कमिटी सदस्य रामा गावडे यांचे सहकार्य लाभले. 





No comments:

Post a Comment