देवरवाडी येथील वैजनाथ देवाची यात्रा रद्द, वाचा काय आहे कारण - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2021

देवरवाडी येथील वैजनाथ देवाची यात्रा रद्द, वाचा काय आहे कारण

 

देवरवाडी येथील श्री.वैजनाथ मंदिर 

चंदगड / प्रतिनिधी 

       देवरवाडी (ता. चंदगड) येथील श्री वैजनाथ देवस्थानची गुरुवार (दि .११ मार्च रोजी) होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

      सद्या महाराष्ट्रामध्ये कोरोणाचा संसर्ग वेगाने होत असल्याने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत जनतेच्या हितासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून स्थानिक सल्लागार उपसमितीच्या वतिने गुरुवारी होणाऱ्या महाशिवरात्रीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रसह कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक यात्रेसाठी गर्दी करतात. याचाच विचार करत समितीने हा निर्णय घेतला आहे. सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन देवस्थान कमिटीने केले.

No comments:

Post a Comment