चंदगड नगरपंचायतीमार्फत दिव्यांगांना ५ टक्के राखीव निधीचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2021

चंदगड नगरपंचायतीमार्फत दिव्यांगांना ५ टक्के राखीव निधीचे वाटप

 

चंदगड येथील नगरपंचायतीच्यावतीने दिव्यांगांना ५ टक्के राखीव निधीचे वाटप करताना नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, शेजारी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला व नगरसेवक.

चंदगड / प्रतिनिधी
        चंदगड नगरपंचायतीमार्फत सन २०२०-२१ मधील ५ टक्के दिव्यांग राखीव निधीचे वाटप नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांच्या हस्ते नगरपंचायतीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी मारुती पाऊसकर, बाळकृष्ण कुंभार यांनी दिव्यांगाना येणार्‍या अडचणीविषयी माहिती स्पष्ट केली. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, विरोधी पक्षनेते नगरसेवक दिलीप चंदगडकर, शिक्षण सभापती बाळासाहेब हळदणकर यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. आभार राजू शिंदे यांनी मानले. 

No comments:

Post a Comment