सर्पोउद्यानासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी पत्रकार परिषदमध्ये वाघमारे यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2021

सर्पोउद्यानासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी पत्रकार परिषदमध्ये वाघमारे यांची मागणी

चंदगड / प्रतिनिधी 

          ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सर्पोउद्यानासाठी शासनाने दहा एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी तानाजी वाघमारे यांनी दाटे (ता. चंदगड) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत  केली. 

       चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे बाबूराव टक्केकर यांनी चाळीस वर्षांपूर्वी सर्पालय सुरू केले. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, शत्रु नाही हा विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. प्रसंगी कुटुंबाचा, समाजाचा रोष ओढवून घेतला, हाल सोसले. त्यांच्याच शैक्षणिक संस्थेच्या मामासाहेब लाड विद्यालयाच्या परिसरातील सर्पालयात विविध जातींच्या सर्वांचे संरक्षण व सखोलपणे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी एक संशोधनात्मक केंद्र निर्माण केले. सापांच्या विषयी लोकांत असलेली भीती दूर केली. ढोलगरवाडी व परिसरातील लोक गेली तीन चार दशके सापांच्याबाबतीत भयमुक्त आहेत असे सांगुन ढोलगरवाडी हायस्कूलचा प्रत्येक विद्यार्थी सर्पमित्र आहे. आपल्या देशातील असे एकमेव शिक्षण केंद्र आहे की येथे विद्यार्थी दशेत सर्पाबद्धल  ज्ञान मिळत आहे. कोणतीही मदत नसताना हे सर्पालय सुरू आहे, सर्पालयासाठी शासनाने दहा एकर जागा व सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास मोठे सर्पोद्यान उभारता येईल व हे आशिया खंडातील एक वैशिष्ट्यपूर्ण सर्पोद्यान, सर्पसंशोधन केंद्र निर्माण होईल. यासाठी शासनाने लक्ष घालून घातलेले निर्बंध काढावेत असे वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
No comments:

Post a Comment