चंदगड / प्रतिनिधी
अलबादेवी ता चंदगड येथील मनोहर पुंडलिक शिवनगेकर यांच्या राहत्या घराला गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत रोख रक्कम पन्नास हजार रुपये व संसारोपयोगी वस्तूंसह संपूर्ण घर जळून दहा लाखांचे नूकसान झाले आहे. सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. मनोहर शिवनगेकर हे पत्नी सह आकरा वाजण्याच्या दरम्यान शेताकडे गेले होते, दरम्यान आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा घरातून अचानक धुराचे लोळ बाहेर पडले. त्यामुळे ग्रामस्थ जमा झाले, सर्वांनी पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग सिंलेडर गॅस गळती लागल्याने ग्रामस्थांना आवाक्यात आली नाही.त्यामुळे गडहिंग्लज येथील नगरपरिषदेचा बंब पाचारण करण्यात आला,त्यानंतर आग आटोक्यात आली.मात्र तोपर्यंत आगीत रोख पन्नास हजार रूपये, भात २५पोती,नाचना १०पोती ,भूईमूगाची ५ पोती,सोन्याच्या दोन अंगठ्या,दोन तोळ्याचे मंगळसूत्र, दोन मोबाईल ,तिजोरी कपाट, फ्रिज, टिव्ही, भांडी आदी साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी मंडलाधिकारी अशोक कोळी, तलाठी विजया भोसले,सरपंच रेखा देवळी, ग्रामसेवक सुवर्णा वळवी,पोलिस पाटील,आनंद पवार, श्रीकांत नेवगे, पुंडलिक घोळसे, रामकृष्णा पाटील आदींनी पंचनामा केला.
मनोहर शिवनगेकर यांच्या घराला लागलेली आगीत रोख पन्नास हजार रूपये सह आयुष्यभराची कमाई जळून राख रांगोळी झाली.तासाभरात आगीच्या भक्ष्यस्थानी पडून अवघा संसारच उघड्यावर पडला.या आगीत अंगावरील कपडेच शिल्लक राहिले आहेत.या आगीत उघड्यावर पडलेल्या मनोहर शिवनगेकर यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची गरज आहे.
No comments:
Post a Comment