शिरगांव ग्रामपंचायत जागेतील अतिक्रमण काढण्यास ग्रामपंचायतीची चालढकल, ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2021

शिरगांव ग्रामपंचायत जागेतील अतिक्रमण काढण्यास ग्रामपंचायतीची चालढकल, ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन

  


चंदगड / प्रतिनिधी 

       मजरे शिरगांव (ता. चंदगड) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण झाले असून ते काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर यांनी ग्रामसेवक, सरपंच व कमिटीला आदेश देवूनही कार्यवाही केली नाही. 

          त्याच्याकडून कायदा व प्रशासनाचा जाणीवपूर्वक अपमान झाला आहे. ही बाब येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी पंचायत समिती अधिकारी श्री. आळंदे,  ग्रामसेवक धनाजी देसाई व सरपंच सौ. अंकीता आतकारी यांच्या निदर्शनास आणूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. सरपंच, ग्रामसेवक कार्यालयात उपस्थित नसतात त्यामुळे नागरिकांना माहिती किंवा दाखल्यावर सही वेळेत मिळत नाही. सहीसाठी ग्रामस्थांना ३ ते ५ कि. मी. त्यांच्या घरापर्यत फे-या माराव्या लागतात. तसेच सरपंच सौ. आदकारी यांच्या दिराचा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात वारंवार हस्तक्षेप असतो. मर्जीतल्या ठेकेदारांशी संगनमत करुन गावातील पाणी पुरपठा, दिवाबत्ती, आरोग्य सेवा शालेय साहित्य इ. च्या अवाढव्य किंमती लावून व कमी दर्जाचे साहित्य देवून आर्थिक व्यवहारामध्ये भ्रष्टाचार केल्याचे निवेदनात म्हटले आहे. ग्रामसेवक श्री. देसाई यांच्याकडे माहितीची तोंडी विचारणा व लेखी मागणी केली असता ती दिली जात नाही. ठराविक लोकांसाठीच व त्यांच्या सल्याने काम करतात. चौकशीकरिता वरिष्ठ अधिका-यांना वेळोवेळी लेखी निवेदने दिली आहेत. मात्र कारवाई होत नाही. वरष्ठि अधिकारी कारवाई करण्यास जाणीवपूर्वक कसूर करत आहेत. त्यामुळे त्यांचीही आतून हातमिळवणी असावी अशी शंका येते.

        ग्रामसेवक, सरपंच व कमिटीच्या कारभारास लोक अक्षरशः कंटाळले असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. वरील सर्व कारभार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित अधिका-यांवर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना  जि. प. कार्यकारी अधिकारी कोल्हापूर यांना दिल्या आहेत. 



No comments:

Post a Comment