देवरवाडी येथे शेतकऱ्यांच्या घरी चोरी, ६२ हजारांचा माल लंपास - चंदगड लाईव्ह न्युज

12 March 2021

देवरवाडी येथे शेतकऱ्यांच्या घरी चोरी, ६२ हजारांचा माल लंपास

चंदगड / प्रतिनिधी

    देवरवाडी (ता. चंदगड) येथील सौ.मालु यशवंत केसरकर यांच्या घरी अज्ञात चोरट्यांने पाठीमागील दरवाजाची कडी उचकटून घरातील रोख पन्नास हजार रूपये, चार ग्रॅम सोन्याच्य दोन अंगठ्या, एक ग्रॅम सोन्याच्य लाॅकेट,एक जोड चांदीची जोडवी अशा ६२००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत चंदगड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    काल यशवंत केसरकर हे आपल्या पत्नीसह शेताकडे जेसीबीने शेती सपाटीकरणाचे काम सूरू असलेने घराला कुलूप लावून शेताकडे गेले होते,याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांने पाठीमागील दरवाजाची कडी उचकडून घरात शिरून घरातील रोख पन्नास हजार रूपये व सोन्या, चांदीचे दागिने मिळून ६२ हजाराचा मुद्देमाल लंपास केला, याबाबतची फिर्याद मालु यशवंत केसरकर यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे.No comments:

Post a Comment