चंदगड महाविद्यालयातराष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने `जागतिक वन दिन` साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

21 March 2021

चंदगड महाविद्यालयातराष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने `जागतिक वन दिन` साजरा

चंदगड येथे माडखोलकर महाविद्यालयात जागतिक वन दिनानिमित्त महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपन करण्यात आले. 

चंदगड / प्रतिनिधी

        चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सकाळ माध्यम समूहा (YIN) व वनविभागाच्या  वतीने  २१ मार्च हा "जागतिक वन दिन" साजरा करण्यात आला. 

       यानिमित्ताने स्वयंसेवकांनी महाविद्यालय आवारात विविध प्रकारची झाडे लावली. लावलेल्या झाडांना पाणी घातले. कुंपण केले त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली. त्यानंतर प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून प्रदूषण नियंत्रणामध्ये आपला सहभाग असलाच पाहिजे. आपण निसर्गाचे देणे लागतो, निसर्ग आपल्याला भरभरून देतो. पण आम्ही त्याला नेस्तनाबूत करत चाललोय. याला पायबंद घालायला आपण युवा पिढीने शिकले पाहिजे. तरच असे दिन सार्थकी लागतील. निसर्ग आपला सोबती आहे. निसर्गातल्या प्रत्येक घटकाचे रक्षण झाले पाहिजे, तरच हे निसर्गचक्र सुरळीत चालू रहाणार आहे असे विचार प्रमुख अतिथी वनपाल दयानंद पाटील व श्री. सानप यांनी व्यक्त केले.               अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी प्रा. संजय पाटील होते. त्यानी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व वाटचालीचा आढावा घेतला. केलेल्या  सामाजिक उपक्रमांची माहिती दिली व स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक केले. रा. से. यो. विभागाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी घेत अनेक स्तुत्य कार्यक्रम पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील व  'यिन' सकाळ माध्यम समूहाचे प्रोत्साहन व चंदगड  वनविभागाने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. प्रास्ताविक प्रा. व्हि. के. गावडे  यांनी केले. पांडुरंग माईनकर याने मनोगत व्यक्त केले.  सूत्रसंचालन मृणाल नाईक हिने केले तर आभार प्रा. आर. एस. पाटील यांनी  मानले.



No comments:

Post a Comment