कोरज येथील ऐतिहासिक, पुरातन पांडवकालीन माणकेश्वर मंदिराची डागडुजी करण्याची मागणी, कोणी केली ही मागणी, वाचा सविस्तर......... - चंदगड लाईव्ह न्युज

21 March 2021

कोरज येथील ऐतिहासिक, पुरातन पांडवकालीन माणकेश्वर मंदिराची डागडुजी करण्याची मागणी, कोणी केली ही मागणी, वाचा सविस्तर.........

कोरज (ता. चंदगड) येथील ऐतिहासिक व पुरातन पांडवकालीन माणकेश्वर मंदिर

चंदगड / प्रतिनिधी

कोरज (ता. चंदगड) येथे प्राचीन पांडवकालीन मंदिर असून कोरज गावानजिकच्या तलावाकाठी निसर्ग रम्य परिसरात वसलेले आहे. या मंदिराची दुरावस्था होत चालली आहे. त्यामुळे या मंदिराची वेळीच डागडुजी करुन प्राचीन ठेवा जतन करावी अशी मागणी कोरज येथील मंदिर देखरेख व व्यवस्थापन समिती यांनी भारतीय जनता पार्टीचे समरजितसिंग घाटगे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. 

     या मंदिराचे बांधकाम हे मोठ्या आकाराचे दगड एकमेकावर रचुन करण्यात आलेले आहे. कोरज, नागनवाडी, कुर्तनवाडी, कोनेवाडी, गंर्धवगड या पाच गावचे हे मंदिर असुन दसरा दिवाळी या सणाला प्राचिन काळापासुन येथे पालखी महोत्सव संपन्न होतो. काही वर्षापासुन पंचक्रोशिची महाशिवरात्री यात्रा येथे संपन्न होते. पण या मंदिराच्या भिंतीचे दगड ढासळत असल्याने मंदिराला धोका निर्मान झाला आहे. पांडव कालीन मंदिर असल्यामुळे खुप मोठ्या आकाराचे दगड बाजुला सरकुन पडले आहेत. मंदिर पुरातत्व असल्यामुळे स्थानिक पातळीवर डागडुजी करण्यासाठी अडचणी येत आहेत. हा ऐतिहासिक व पुरातत्व ठेवा जपण्याची गरज परिसरातुन व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनाने व पुरातत्व विभागाने या मंदिराची डागडुजी करावी. हा ऐतिहासिक ठेवा जतन करावा अशी मागणी निवेदनातून येथील मंदिर देखरेख व व्यवस्थापन समिती यांनी केली आहे. अधिक माहीतीसाठी तानाजी बेर्डे 9422742446 , बाळासाहेब पेडणेकर 9421206647, बापू शिरगांवकर 9921024707  अध्यक्ष व सदस्य मंदिर देखरेख व देवस्थापण समिती यांच्याशी संपर्क साधावा.




No comments:

Post a Comment