रवीकिरण मिलच्या कामगारप्रश्नी शुक्रवारचा चंदगड तालुका बंद मागे, वाचा काय आहे कारण? - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2021

रवीकिरण मिलच्या कामगारप्रश्नी शुक्रवारचा चंदगड तालुका बंद मागे, वाचा काय आहे कारण?


चंदगड / प्रतिनिधी

      हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहती मधील  रवीकिरण पेपर मिलच्या कामागारांच्या मागण्यांबाबत अजूनही काही निर्णय झाला नाही. या कारणांनी शुक्रवार दि. ५ रोजी होणारा चंदगड तालुका कडकडीत बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला होता. 

        याबाबत जिल्हाधिकारी यांनी कारखाना व्यवस्थापन, कामगार प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आज होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.  आमरण उपोषण मा६ चालूच राहील अशी माहिती कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. रवीकिरण पेपर मिलच्या कामगारांचे आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी गेल्या सहा महिन्यांपासुन  पाटणे फाटा येथे आंदोलन सुरू आहे.  
No comments:

Post a Comment