![]() |
जोतिबा शिंदे |
चंदगड / प्रतिनिधी
कुद्रेमानी (ता. जि. बेळगाव) फाट्यावरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या जोतिबा महादेव शिंदे (वय ४०, रा. तडशीनहाळ, ता. चंदगड) यांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.
या अपघाताची काकती - बेळगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे. कुद्रेमनी फाटा येथे कर्नाटक पासिंगची चार-चाकी गाडी चंदगडच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. यावेळी दुचाकीस्वार ज्योतिबा शिंदे यास जोराची धडक दिली. झालेल्या अपघातात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झली. शिंदे यांची मुलगी मागच्या सीटवर बसली होती. ती किरकोळ जखमी झाली. मात्र जोतिबा यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना बेळगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसाच्या उपचारानंतर त्यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment