![]() |
उत्कृष्ट उपक्रमशील संस्थेचा पुरस्कार स्वीकारताना संस्थाध्यक्ष संदीप चिंचणगी. |
चंदगड / प्रतिनिधी
मौजे कार्वे (ता. चंदगड) येथील अभिनव एज्युकेशन सोसायटी या संस्थेला ने.यू.के (भारत सरकार) संलग्न जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूरच्या वतीने उत्कृष्ट उपक्रमशील शिक्षण संस्था हा पुरस्कार देण्यात आला. अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संदीप चिंचणगी यांनी हा पुरस्कार करवीरच्या सभापती मीनाक्षी पाटील, डॉ. शितोळे यांच्या शुभहस्ते स्वीकारला. त्यामुळे चंदगड तालुक्यात सर्वत्र या संस्थेचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment