महागांव येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकच्या ३६ विद्यार्थ्यांची बजाज ॲटो लिमिटेड पूणे येथे निवड - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2021

महागांव येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकच्या ३६ विद्यार्थ्यांची बजाज ॲटो लिमिटेड पूणे येथे निवड

कॅम्पसमध्ये निवड झालेले विद्यार्थी.

सी. एल. वृत्तसेवा, महागाव 

     महागांव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकमध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी बजाज ऑटो लिमिटेड पूणे या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॅम्पसन प्लेसमेंटची सुरवात करण्यात आली. या कंपनीच्या कॅम्पस निवडप्रक्रियेमधून मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या पंधरा (१५),  इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या दहा (१०)  व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या अकरा (११) अशा एकूण ३६ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये वार्षिक रु.१. ४० लाख वेतनावर निवड करण्यात आलेची माहिती प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. संतोष गुरव यांनी दिली.

          पॉलिटेक्निकला मिळालेल्या एन. बी.ए. क्रिडेशनमुळे राखलेली सातत्यपूर्ण उच्च शैक्षणिक गुणतत्ता तसेच प्लेसमेंट विभागाकडून सातत्याने होणारे निवड प्रक्रियेसाठीचे मार्गदर्शन. यामुळेच प्रथम सत्रामध्येच बजाज ऑटो लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीने एस. जी. एम. पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी सलग चौथे वर्षी कॅम्पसचे आयोजन करण्यात आले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पॉलिटेक्निकतर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची निवड प्रक्रिया सुरु झाली असून पात्र विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकमध्ये अनेक मल्टिनॅशनल कंपनीच्या प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करण्यात येते, असे प्राचार्य डॉ. संजय दानोळे यांनी सांगितले.

         विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे शिक्षण पुर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. ड. आण्णासाहेब चव्हाण, विश्वस्थ डॉ. यशवंत चव्हाण, विश्वस्थ डॉ. संजय चव्हाण, सचिव ड. बाळासाहेब चव्हाण, रजिस्ट्रार श्री. शिरीष गणाचार्य यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्लेसमेंट ऑफिसर, सर्व विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
No comments:

Post a Comment