अर्जुनवाडी येथे अज्ञाताकडून झाडांची कत्तल, नेसरी पोलीस चौकीत तक्रार दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2021

अर्जुनवाडी येथे अज्ञाताकडून झाडांची कत्तल, नेसरी पोलीस चौकीत तक्रार दाखल

अज्ञाताने तोडलेले झाड.चंदगड / प्रतिनिधी

       अर्जूनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे ३ मार्च  रोजी कोणी अज्ञात  विकृत व्यक्तीने  अर्जुनवाडी येथील डॉ. संतोष शांताराम मोरे यांच्या शेतीमधील बोअर पाईप लाइन तोडून तसेच काजूची झाडे तोडून मोठे नुकसान केले आहे. याबाबत नेसरी पोलीस चौकीत व वन विभागाकडे  तक्रार केली आहे.

  आई-वडिलांनी खूप मेहनतीने झाडांची लागण करून त्यांची मोठ्या मेहनतीने संगोपन केले होते. ती झाडे बुडक्यातून तोडून मोठे नुकसान केले आहे. संमधीत अज्ञात वरकरणी कोण आहे याचा तपास करून कारवाई करावी अशी मागणी  करण्यात आली आहे.

       नेसरी पोलिस चौकीचे पो. स. नि अविनाश माने यांनी आज स्वतः पहाणी करून आय. पी. सी. ४३७ नुसार गुन्हा नोंद करून घेवून तपास करत आहेत. 
No comments:

Post a Comment