ट्रॅक्टर चालकास पंधरा हजाराचा दंड, वाचा काय आहे कारण? - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2021

ट्रॅक्टर चालकास पंधरा हजाराचा दंड, वाचा काय आहे कारण?चंदगड / प्रतिनिधी

      चंदगड तालुक्यातील डूक्करवाडी येथील धोंडिबा मातारु घोळसे (वय - ६०) व गजानन धोंडिबा डोळसे (वय - ३१) यांना चंदगड ते चंदगड फाटा दरम्यान ट्रॅक्टर पोलीसांनी अडवून कागदपत्रे मागणी केली. यावेळी असे आढळून आले की ट्रॅक्टर (क्र. एम. एच. 09, FS-1655) व ट्राॅली ( एम. एच. 09, FB-0275) विनापरवाना व चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे आढळून आले. या कारणाने चंदगड पोलीसांनी २७ फेब्रुवारी २०२१ रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याबाबत  चंदगड न्यायालयात ट्रॅक्टर चालक व मालक यांना दोषी ठरवून पंधरा हजाराचा दंड ठोठावण्यात आला. No comments:

Post a Comment