नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून दिर भावजयी मध्ये हाणामारी, परस्पर विरोधी गून्हे दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2021

नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून दिर भावजयी मध्ये हाणामारी, परस्पर विरोधी गून्हे दाखल

 


चंदगड/प्रतिनिधी :--

 म्हाळूंगे खालसा ता चंदगड येथे वडिलोपार्जीत पाण्याच्या नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून दिर भावजयीत जोरदार हाणामारी झाली, दिराच्या विरोधात भावजयीने व भावजयीच्या विरोधात दिराने चंदगड पोलिसांत परस्पर तक्रारी दाखल केल्या आहेत.याबाबत अधिक माहिती अशी कि प्रकाश विष्णू पाटील (रा म्हाळूंगे खालसा)हे आपली पत्नी पुजा यांच्यासह घराच्या पाठीमागील बाजूस वडिलांच्या नावे असलेल्या नळावर प्लॅस्टीक हंडा घेऊन पाणी भरत असतांना मालती विष्णू पाटील यांनी तू आमच्या पारड्यात पाणी भरायचे नाही, मला लाकडाने मार व नंतर पाणी भर असे मोठ्याने ओरडून सांगत असताना प्रकाश याची पत्नी पूजा पारड्यात आली असता मालतीने पूजा हिला शिवीगाळ करून तीचे केस ओढून जमीनीवर पाडले, मनिषा रामलिंग पाटील हिने लाथाबूक्यानी माराहण सूरू केली. हे भांडण सोडवायला गेलेल्या प्रकाश याला रामलिंग विष्णू पाटील,विक्रम रामलिंग पाटील, विष्णू लक्ष्मण पाटील व रोहित रामलिंग गुरव(रा तूडये) या सर्वानी काठीने जबर माराहण केली.तर प्रकाश पाटील यांचा एम आय कंपनीचा मोबाईल या भांडणात फोडल्याची फिर्याद प्रकाश पाटील दिली आहे, तर पाण्याच्या नळावर भरलेला हंडा बाजूला ठेवल्याच्या कारणावरून मनिषा रामलिंग पाटील यांना प्रकाश पाटील व पूजा पाटील या नवरा बायकोने मालती हिचे केस ओढून जमिनीवर पाडून लाथाबूक्यानी माराहण केली तर मालती हिच्या डोक्याला दगड मारून जखमी केल्याची फिर्याद मनिषा पाटील यानी चंदगड पोलिसांत दिली आहे.
No comments:

Post a Comment