सदावरवाडी येथील शेतकऱ्याला बीडच्या ऊसतोडणी टोळी मूकादमाचा चार लाखांचा गंडा - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2021

सदावरवाडी येथील शेतकऱ्याला बीडच्या ऊसतोडणी टोळी मूकादमाचा चार लाखांचा गंडा

 


चंदगड/प्रतिनिधी:-- 

सदावरवाडी ता चंदगड येथील परशराम नारायण सदावर (वय वर्षे ४८)या कारखान्याला ऊस वहातूक करणार्या ट्रक्टर मालक शेतकर्याला ऊस तोड करणार्यासाठी चौदा मजूर (सात कोयते ) पूरवतो असे सांगून करार,नोटरी करूनही दोन वर्षांत ३ लाख ९८,००० रू गंडा घालणा-या पोपट दैवत घाडगे (रा ढाकेफळ,ता केज,जि बीड) या मूकादमाविरोधात चंदगड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी कि परशराम सदावर यांनी आपल्या ट्रक्टराची ऊस तोड करणार्यासाठी लागणारे मजूर पूरवठा करण्यासाठी  २०१९-२०या हंगामासाठी चार लाख दहा हजार रूपये धनादेशाद्वारे देऊन सुध्दा  मूकादम घाडगे याने मजूर पूरवले नाहीत,पून्हा  २०२०-२१ या हंगामात मजूर पूरवण्यासाठी एक लाख रूपये दिले.मूकादम घाडगे  याने

२८/८/२०२०रोजी केज,जि बीड येथे आपणास पाच लाख दहा हजार रूपये पोहचल्याचे नोटरी करारपत्र करून दिले आहे. त्यानंतर ट्रक्टर मालक सदावर हे मजूर टोळी आणण्यासाठी कडे येथे गेले असता ८०,००० रूपये रोख दिले.परंतु करारामध्ये ठरल्याप्रमाणे मूकादम याने चौदा मजूर (सात कोयते) न देता फक्त आठ मजूर (चार कोयते) पूरवले. या आठ ऊस तोड मजूरानी दोन महिन्यांत फक्त एक लाख ९२ हजार  रूपयाचे काम करून त्यांच्याकडे  तीन लाख ९८हजार रूपये शिल्लक असताना काम निम्यावर सोडून मूकादम घाडगे मजूरासह पळून गेल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याची फिर्याद परशराम सदावर यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे.




No comments:

Post a Comment