ढोलगरवाडी येथे हळदी- कुंकु समारंभ उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2021

ढोलगरवाडी येथे हळदी- कुंकु समारंभ उत्साहात

ढोलगरवाडी येथे हळदीकुंकू कार्यक्रमावेळी उपस्थित महिलावर्ग.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यात  ढोलगरवाडी येथे ग्रामपंचायत ढोलगरवाडी यांच्या वतीने हळदी- कुंकु कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

      याप्रसंगी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या म्हणुन हलकर्णी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. व्हटकर यांनी महिलांना मागदर्शन केले. यावेळी महिलांना सक्षम बनने काळाची गरज आहे हे महत्व पटवून दिले. प्रमुख पाहुणे म्हणुन पंचायत समिति चंदगडच्या उपसभापति सौ. मनिषा शिवनगेकर माजी, उपसभापती वीठाताई मुरकुटे यांनी मनोगते व्यक्त केली. दिपप्रज्वलन मुख्याधिपिका सौ. लिलाताईं  पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षा सरपंच सौ. सरिता तुपारे यांनी महीलांना मार्गदर्शन करुन कोरोना सबंधित लस घेण्यास आवाहन केले. प्रमुख उपस्तिथी म्हणुन उपसरपंच  बाबुराव तुपारे, अनिल शिवनगेकर, ग्रा. पं. सदस्य सौ. सुस्मिता संजय पाटील, सौ. शोभा  कांबळे, चन्द्रकांत सुतार, प्रा. दिपक पाटील, ग्रामसेविका, आरोग्य सेविका, आशा, अंगणवाड़ी सेविका, मदतनिस व इतर ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दीपक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन तंटामुक्त अध्यक्ष प्रा. सदाशिव पाटील यांनी केले. आभार विलास कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment