चंदगडकराच्या सेवेत शववाहिका दाखल, पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आश्वासनाची पूर्तता - चंदगड लाईव्ह न्युज

30 March 2021

चंदगडकराच्या सेवेत शववाहिका दाखल, पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आश्वासनाची पूर्तता

चंदगडकरांच्या सेवेत दाखल झालेली शववाहिका.

चंदगड / प्रतिनिधी

        चंदगड नगरवासीयाच्या सेवेत आज शववाहिका दाखल झाली. नवीन नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर नगरसेवकांनी केलेल्या मागणीची पूर्तता पालकमंत्री सतेज पाटील यानी केली. 

    दोन महिन्यांपूर्वी नगराध्यक्षा सौ. प्राची दयानंद काणेकर, नगरसेवक अभिजित गुरबे व इतर नगरसेवकांनी कोल्हापूर येथे नगरपंचायत विकासासाठी शववाहिकेसह विविध विकास कामांसाठी निधी मिळावा या साठी निवेदन दिले होते. पालकमंत्री पाटील यानी या निवेदनाचा प्राधान्याने विचार करून चंदगड नगरपंचायतीची अडचण लक्षात घेऊन शववाहिका दिली.उपनगराध्यक्ष  फिरोज मुल्ला पं स सदस्य दयानंद काणेकर, माजी जि. प. सदस्य राजेंद्र परीट, नगरसेवक अभिजित गुरबे, नगरसेवक बाळासाहेब उर्फ आनंद हळदणकर, अशोक दाणी, संजय चंदगडकर, मेहताब नाईक, झाकीर नाईक यांच्यासह अन्य नगरसेवकांचे या कामी सहकार्य लाभले.

        दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री  सतेज पाटील यांचे कडे चंदगड नगरपंचायतीला शववाहिकेसह विकास निधी मिळावा अशी मागणी   निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर लागणारी कागदपत्रे व प्रस्तावासाठी नगरसेवक अभिजित गूरबे यानी पाठपुरावा केला.No comments:

Post a Comment