आयुष्यात हितावह असणाऱ्या गोष्टी आचरणात आणा - पोलिस निरीक्षक श्री. तळेकर, तुर्केवाडी येथे लैंगिक प्रतिबंधक समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचे समुपदेशन - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2021

आयुष्यात हितावह असणाऱ्या गोष्टी आचरणात आणा - पोलिस निरीक्षक श्री. तळेकर, तुर्केवाडी येथे लैंगिक प्रतिबंधक समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचे समुपदेशन

तूर्केवाडी (ता. चंदगड) येथील जनता विद्यालयात विद्यार्थ्यांना समूपदेशन करताना पो. नि. बी. ए. तळेकर, बसलेले जी. एन. पाटील, पो. पाटील माधूरी कांबळे व इतर मान्यवर. 


चंदगड / प्रतिनिधी 

          जीवनात  सर्वात जवळचा हितचिंतक कोण असेल तर ते तुमचे आई-वडील आणि शिक्षक आहेत. त्यामूळे  त्यांच्या आज्ञेचे, उपदेशाचे पालन करा. तुमच्या हितावह असणाऱ्या गोष्टी ऐकून त्या आचरणात आणा, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी आणि आनंदी राहू शकाल. या वयात तुम्ही फेसबूक, व्हाट्सअप यापासून दूर राहून आपले भविष्य घडवायचे आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक बी.ए तळेकर यांनी केले. 

        तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील जनता विद्यालयात लैंगिक प्रतिबंधक समिती मार्फत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी  सचिव जी. एन. पाटील होते. पोलीस पाटील माधूरी कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी बालपण हरवू नये, आपला अभ्यासाकडे असणारा कल कमी होऊ देऊ नये, यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्नशील राहून देशाच्या भावी पिढीला वाचविण्याचे काम करायचे आहे. आजची मुलं हि उद्याचे पालक आहेत. तेच आपल्या देशाचे भवितव्य आहे. हे भवितव्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना प्रतिसाद देऊन समाजात घडणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यात मदत करावी असे आवाहन केले.

       यावेळी  रमेश शिवनगेकर, पी. एम. ओऊळकर, एन. एल. कांबळे, एम. के. पाटील आदीसह शिक्षक, विद्यार्थ्यी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. ए. पाटील तर आभार बी. एन. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment