जेलुगडे येथील वैभव गावडे याची बी. एस. एफ. मध्ये निवड - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2021

जेलुगडे येथील वैभव गावडे याची बी. एस. एफ. मध्ये निवड

वैभव गावडे

चंदगड / प्रतिनिधी

  जेलुगडे (ता. चंदगड) येथील वैभव गोपाळ गावडे या महाविद्यालयीन यूवकाची बी. एस. एफ. (बाॅर्डर सिक्यूरिटी फोर्स) मध्ये निवड झाल्याने त्याचे अभिनंदन होत आहे. 

        प्रतिकुल परिस्थितीत  वडिलानी शेती सांभाळून प्रसंगी बेळगावला हॉटलमध्ये काम करून आपल्या मुलांना शिक्षण दिले. वैभवच्या या नियुक्तीने जेलुगडे गावात आनंदाचे वातावरण आहे. आपला मुलगा देशसेवेसाठी जाणार म्हणून आईवडिल व लहान बहिण आनंद व्यक्त करत आहेत. त्याचे दहावी पर्यंत शिक्षण माऊली विद्यालय तिलारीनगर येथे तर पुढील शिक्षण चंदगड येथील महाविद्यालयात सुरू आहे.
No comments:

Post a Comment