चंदगड पं. स. स्तरावरील सेवक पतसंस्थेच्य अध्यक्षपदी भोसले, उपाध्यक्षपदी भुरके - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2021

चंदगड पं. स. स्तरावरील सेवक पतसंस्थेच्य अध्यक्षपदी भोसले, उपाध्यक्षपदी भुरके

उत्तम भोसले                     कबीरदास भुरके
चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड तालुका पंचायत समिती स्तरावरील सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी उत्तम केदारी भोसले तर उपाध्यक्षपदी  कबीरदास भीमराव भुरके यांची निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी के. आर. कोळी होते. 

          अध्यक्षपदासाठी उत्तम भोसले यांचे नाव सुनील कुंभार यांनी सुचविले. त्यांना अनुमोदन बसवानी शिरगे यांनी दिले. उपाध्यक्षपदासाठी कबिरदास भुरके यांचे नाव विलास पाटील यांनी सुचविले. त्याला अनुमोदन सोनाप्पा कोकितकर यांनी दिले. यावेळी मावळते अध्यक्ष संजय ढेरे यांनी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार केला. यावेळी सुरेश सावंत, दत्ताराव कांबळे, मधुकर नागरगोजे, श्रीमती सुरेखा नाईक, धनाजी पाटील, प्रकाश बोकडे, नारायण पाटील, आण्णाप्पा वांद्रे, मारूती चिंचणगी उपस्थित होते. आभार गणपत सावंत यांनी मानले.No comments:

Post a Comment