कुर्तनवाडी येथील बाळासाहेब चौकुळकर यांची इंटकच्या अध्यक्षपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2021

कुर्तनवाडी येथील बाळासाहेब चौकुळकर यांची इंटकच्या अध्यक्षपदी निवड

 

बाळासाहेब चौकुळकर

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड  येथील एसटी आगारातील महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसच्या  (इंटक) चंदगड आगार अध्यक्षपदी वाहक बाळासाहेब रामू चौकुळकर (रा. कुर्तनवाडी) यांची निवड करण्यात आली. सचिवपदी डी. आर. कोरवी यांची निवड झाली. संघटनेच्या बैठकीत सर्वानुमते ही निवड झाली. कामगारांच्या हितासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे चौकुळकर यांनी सांगितले.



No comments:

Post a Comment