जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केला गुरूवारी चंदगड तालुक्याचा धावता दौरा, काय आहे कारण..... - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2021

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केला गुरूवारी चंदगड तालुक्याचा धावता दौरा, काय आहे कारण.....


सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

        जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरूवारी चंदगड तालुक्याचा धावता दौरा करत चंदगड तहसील कार्यालयाला भेट देऊन तालुक्यातील कोविड-१९ संदर्भात माहिती घेतली. 

      यावेळी चंदगड नगरपंचायतीचे गटनेते दिलीप चंदगडकर यांनी प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन स्वागत केले. यावेळी चंदगड तालुक्यातील झालेल्या पाणंद रस्त्यांच्या धर्तीवर सेंट स्टिफन्स स्कूल ते बेळगाव - वेंगुर्ले रस्त्याला जोडणारा वाली पेट्रोल पंपापर्यंतचा पाणंद रस्ता खुला करण्याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी पाणंद रस्ते खुले करण्याबाबत सकात्मक चर्चा केली. यापूर्वी पाणंद रस्त्याबाबत प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना संबंधीत सर्कल, गावकामगार तलाठी यांना सुचना देऊन पाणंद रस्त्याचे काम मार्गी लावणार असल्याचे सांगितले. यावेळी तहसीलदार विनोद रणवरे, नगरसेवक सचिन नेसरीकर, प्रकाश पाटील, विजय गुरव, आकाश चंदगडकर, ओमकार चंदगडकर, अशोक पोतनिस, तेजस गावडे, जय बुरूड, संकेत बुरूड, सलीम सय्यद आदींची उपस्थिती होती.No comments:

Post a Comment