पूरस्थिती बाबत कोवाड व्यापारी संघटनेकडून आमदार राजेश पाटील यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2021

पूरस्थिती बाबत कोवाड व्यापारी संघटनेकडून आमदार राजेश पाटील यांना निवेदन

 

पूरस्थिती बाबत आमदार राजेश पाटील यांना निवेदन देताना कोवाड व्यापारी संघटनेचे सदस्य

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

      कोवाड बाजारपेठ व कोवाड गावात ताम्रपर्णी नदिच्या उथळ व अतिक्रमीत झालेल्या पात्रामुळे उद्भवणाऱ्या पुर पुरस्थितीबाबत कोवाड व्यापारी संघटनेकडून व्यापाऱ्याच्या सह्यानिशी आमदार राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

        निवेदनात म्हटले आहे कि,आपल्या मतदार संघातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कोवाड बाजारपेठेला वारंवार पुर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे . यामध्ये व्यापारी बांधवाना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे . गेली वीस - पंचवीस वर्षे ताम्रपर्णी नदीत बारमाही पाणी असल्यामुळे नदीच्या पात्रात खुप गाळ साचून नदीचे पात्र उथळ झालेले आहे . तसेच मानवनिर्मित अतिक्रमणसुद्धा या परिस्थितीला कारणीभूत आहे . यावरती उपाययोजना म्हणून माणगाव पुल ते कामेवाडी पुल या हद्दीत नदीपात्रात झालेली अतिक्रमणे काढणे व नदीपात्रात साचलेला गाळ काढून नदीपात्र पुर्ववत करण्यासाठी संबंधित विभागाकडून योग्य त्या उपययोजनांची अंमलबजावणी करुन कोवाड बाजारपेठ व कोवाड गावाला या महापूराच्या संकटातून वाचवण्यासाठी आपण योग्य ती मदत करावी , ही नम्र विनंती केली आहे यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम,गुलाब पाटील,विनायक पोटेकर,सचिन पाटील,जोतिबा पाटील,चंद्रकांत कुंभार आदी व्यापारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment