कोवाड नदीपात्रातील अतिक्रमण हटविणेबाबत किणी ग्रामपंचायतीकडून आमदार राजेश पाटील यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2021

कोवाड नदीपात्रातील अतिक्रमण हटविणेबाबत किणी ग्रामपंचायतीकडून आमदार राजेश पाटील यांना निवेदन

आमदार राजेश पाटील यांना निवेदन देताना किणीचे सरपंच संदीप बिर्जे,सदस्य गजानन कुंभार,आप्पा हुंदळेवाडकर,लक्ष्मण पाटील इ.


कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

    कोवाड नदीपात्रातील दिवसागणिक वाढत चाललेली अतिक्रमणे हटविण्याबाबत किणी ता चंदगड येथील ग्रामपंचतीकडून आमदार राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

         सदर निवेदनात म्हटले आहे की,मागील चार वर्षापासून ताम्रपर्णी नदीला येणाऱ्या पुरामुळे मौजे किणी हद्दीतील बाजार पेठ व शेती क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे . यासाठी आपल्या स्तरावर वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे . नदीपात्रात बंधाऱ्याला लागून दोन्ही बाजूला अतिक्रमण झाले आहे , हे अतिक्रमण हटवून नदीला येणाऱ्या पुराचे नियोजन करावे , कोवाड बाजारपेठ मध्ये नदीला लागून राजरोस अतिक्रमण होत आहे . नदीपात्रात असलेली मंदिरे व गटर बांधकाम मुळे नदीतील बरेच पिलर बंद झाले आहेत . हे अतिक्रमण हटवून नदीपात्राशेजारील शेतकऱ्यांना सहकार्य करावे जेणेकरून पुढील काळातील होणाऱ्या नुकसानीला आळा बसवता येईल व पूर रेषेतील तसेच सर्व जनतेला सोयीचे होईल . जनतेच्या भावनांचा मंदिराबाबातीत विचार झाला तरी नुकसान होणाऱ्या शेतकरी यांची संख्या हि यापेक्षा जास्त आहे .त्यांच्या भावनांचा सुद्धा विचार व्हावा अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे यावेळी किणीचे सरपंच संदीप बिर्जे,सदस्य गजानन कुंभार,आप्पा हुंदलेवाडकर,लक्ष्मण पाटील,वसंत सुतार,किणी व्यापारी संघटनेचे व्ही,के,दळवी,संदीप सुतार सह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment