कोल्हापूर आकाशवाणीवर चंदगड तालुक्यातील साबळे यांची मुलाखत, वाचा कोण आहे हि व्यक्ती...... - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2021

कोल्हापूर आकाशवाणीवर चंदगड तालुक्यातील साबळे यांची मुलाखत, वाचा कोण आहे हि व्यक्ती......


दि न्यू इंग्लीश स्कूलचे अध्यापक संजय साबळे

तेऊरवाडी / सी. एल. वत्तसेवा

            कोल्हापूर आकाशवाणीच्या १०२ अंश ७ मेघा हार्ट्सवर दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगडचे अध्यापक संजय गोपाळ साबळे यांची मुलाखत कोल्हापूर आकाशवाणीचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीना मिस्त्री यांनी घेतली. 

       कोरोनाच्या महामारीमुळे या वर्षी इ. १०वीच्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. अशातच परीक्षेचे वेळापत्रक जाहिर झाले. बोर्डाच्या परीक्षेचा पहिलाच मराठीचा पेपर. अशा कृतिपत्रिकेला सामोरे कसे जायचे?. साडेतीन तासात कृतीपत्रिका कशी पूर्ण करायची? याविषयी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. यावेळी आकाशवाणी प्रसारण प्रमुख सुनिल गायकवाड,  श्री. कुलकर्णी उपस्थित होते. लवकरच ही मुलाखत दोन टप्प्यात प्रसारीत करण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment