चंदगड तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. गोविंद दळवी तर उपाध्यक्षपदी ॲड. विजय कडुकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2021

चंदगड तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. गोविंद दळवी तर उपाध्यक्षपदी ॲड. विजय कडुकर यांची निवड

 

ॲड. गोविंद दळवी                 ॲड. विजय कडुकर 

चंदगड / प्रतिनिधी

    चंदगड तालुका बार असोसिएशनच्या सन २०२१-२२ करीता अध्यक्षपदी ॲड. गोविंद नामदेव दळवी, उपाध्यक्षपदी ॲड. विजय भरमु कडुकर, सचिव म्हणून ॲड. विठोबा शिवाजी जाधव तर खजिनदारपदी ॲड. संदिप सिताराम पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी चंदगड तालुका बार असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

                    
        "बार असोसिएनच्या प्रगतीसाठी सर्वांना एकत्रीत घेऊन काम करणार असल्याचे नुतन अध्यक्ष श्री. दळवी यांनी सत्काराच्या वेळी आपल्या मनोगतात व्यक्त केले. "बार असोसिएशनच्या प्रत्येक सदस्याला योग्य न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे मत नुतन उपाध्यक्ष विजय कडुकर यांनी व्यक्त केले. यावेळी मावळते अध्यक्ष ॲड. एस. एस. पाटील यांच्या हस्ते नर्वनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.No comments:

Post a Comment