चंदगड येथे काॅग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात लाक्षणिक उपोषण - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2021

चंदगड येथे काॅग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात लाक्षणिक उपोषण

 


चंदगड / प्रतिनिधी 

      केंद्र शासनाने  संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर लादलेले कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढीचा जनता भरडली जात आहे. हे अन्यायी कृषी कायदे व महागाई मागे घ्यानी या मागणी साठी आज चंदगड तालूका राष्ट्रीय काॅग्रेस च्या वतीने चंदगड येथे तहसिल कार्यालयाच्या समोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.     

         तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांच्या अध्यक्षतेखाली  एम. जे. पाटील,तात्यासाहेब देसाई, बाबासाहेब देसाई,जे.बी.पाटील, नगरसेवक आनंद हळदणकर, बाबू परीट, अशोक दाणी कलीम टेलर, प्रसाद वाडकर, उदय देसाई, जयवंत शिंदे, जयसिंग पाटील,  संदीप नंदवडेकर, सरपंच अस्मिता दळवी, ॲड. रवि रेडेकर,  कृष्णा पाटील, गुलाब मदार, अभिजित गुरबे, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षक बी ए  तळेकर यांच्या हस्ते सरबत घेवुन उपोषणाची सांगता झाली.No comments:

Post a Comment