हलकर्णी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यीनीना बॅरि पी. जी. पाटील गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2021

हलकर्णी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यीनीना बॅरि पी. जी. पाटील गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त

हलकर्णी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यीनीना बॅरि पी. जी. पाटील गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. यातील एका विद्यार्थ्यींनीचा पत्र देताना शिक्षक.

चंदगड / प्रतिनिधी

        हलकर्णी (ता. चंदगड) येथील  यशवंतराव चव्हाण  महाविद्यालयातील तीन विद्यार्थाना बॅरि. पी. जी. पाटील गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रत्येकी २000 रूपये प्रमाणे प्राप्त झाली. त्यामध्ये  दिपाली कृष्णा कदम,  एकता बाळू पाटील,  सानिया निसार देसाई या विद्यार्थीनींचा समावेश आहे. दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष  संजय पाटील, सचिव विशाल पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. गवळी, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख प्रा. मधुकर जाधव अधिक्षक  प्रशांत शेंडे व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment