सोशल मिडीया सेल कार्यकारीणी निवडीसंदर्भात महत्वपुर्ण बैठक संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2021

सोशल मिडीया सेल कार्यकारीणी निवडीसंदर्भात महत्वपुर्ण बैठक संपन्न

पुणे / प्रतिनिधी

        पुणे जिल्हा पञकार संघाच्या  कार्यकारिणीची महत्वपुर्ण बैठक रविवार दि. १४ मार्च २०२१ रोजी आय बी हॉल, पुणे  येथे संपन्न झाली. या बैठकीत  सोशल मिडीया सेल कार्यकारीणी निवडी संदर्भात व महत्त्वपुर्ण विषयावर चर्चा झाली. यावेळी मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली मराठी पञकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या  सोशल मिडीया संघटनेची स्थापन करण्यासंदर्भात मराठी पञकार परिषदेचे  कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांनी उपस्थित राहून धोरणात्मक मार्गदर्शन केले.

      यावेळी पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा समन्वयक सुनीलनाना जगताप, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुनील वाळुंज, जिल्हा  महिला प्रतिनिधी श्रावणी कामत, जिल्हा प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, हुतात्मा राजगुरु पञकार संघ चाकण अध्यक्ष हनुमंत देवकर, सर्वश्री निलेश जगताप, प्रमोद गव्हाणे, सूरज साळवे, बाबाजी पवळे, शरद राजगुरु, मनिषा राजगुरु, समीर आत्तार, रफिक इनामदार, सुनील पवार आदी उपस्थित होते. पुणे जिल्हा पञकार संघाचे संपर्क कार्यालय त्वरीत सुरु करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. आभार हनुमंत देवकर यांनी मानले.No comments:

Post a Comment