भागातील जनतेने काम करण्यांच्या पाठीशी उभे रहावे - भरमूआण्णा पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2021

भागातील जनतेने काम करण्यांच्या पाठीशी उभे रहावे - भरमूआण्णा पाटील

अलबादेवी (ता. चंदगड) येथे अडकुर-अलबादेवी रस्त्याचे शूभारंभ प्रसंगी माजी मंत्री भरमू आण्णा पाटील, सचिन बल्लाळ, बबनराव देसाई सरपंच रेखा देवळी व श्रीकांत नेवगेव इतर


चंदगड / प्रतिनिधी

      १९९९ साली माझ्या मंत्री पदाच्या काळात अलबादेवी गावात बोअरवेल  व जॅकवेलच्या माध्यमातून २९ लाख रुपये किमतीची जी पाण्याची योजना मंजूर होवून ग्रामस्थांची सोय झाली आहे. ती आजपर्यंत निरतंर आहे. त्याचे समाधान  असुन या भागातील जनतेने काम करण्यांच्या पाठीशी उभे रहावे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री भरमू आण्णा पाटील यांनी केले.

अलबादेवी (ता. चंदगड) येथे अडकुर-अलबादेवी रस्त्याचे शूभारंभ प्रसंगी बोलताना माजी मंत्री भरमू आण्णा पाटील

     अलबादेवी (ता. चंदगड) येथे जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांच्या फंडातून मंजूर झालेल्या अलबादेवी - अडकुर रस्ताच्या शूभारंभप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच रेखा देवळी होत्या. यावेळी भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

      या वेळी शिवाजीराव पाटील म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे देशासाठी मोठे योगदान दिले आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यांच्या माध्यमातून भविष्यात केंद्राकडून ही चंदगड मतदार संघात निधी साठी प्रयन्त केला जाईल. असे मत व्यक्त करुन राहत्या घराला आग लागलेल्या  मनोहर शिवनगेकर यांना 21हजार रुपये मदत केली.

       जिल्हा परिषद सदस्य बल्लाळ म्हणाले ज्या अपेक्षांन मला तुम्ही निवडून दिले आहे त्या अपेक्षा पुर्ण करण्यास कटीबध्द असुन अलबादेवी एकुण ३८.५० लाख रुपये निधि दिल्याचे समाधान आहेच. यावेळी माजी सभापती बबनराव देसाई, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती उदयकुमार देशपांडे यांची मनोगते झाली. प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत श्रीकांत नेवगे यांनी केले. 

     यावेळी रवी बांदिवडेकर, लहू पाटिल, उपसरपंच राजाराम पाडले, धोडींबा घोळसे, परशराम चौकुळकर, गोपाळ डांगे, विठोबा मोरे, रघुनाथ कोले, यशवंत घोळसे, भाऊ दोरुगडे, सुनिता पाडले,  किसन पाटील, बसाप्पा सुतार, बबन पाडले, मारुती डांगे यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार वैभव डांगे यांनी मानले.

No comments:

Post a Comment