![]() |
चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वाढदिवसानिमित्त ग्रंथपालांच्याकडे आपल्या वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट देताना विद्यार्थ्यींनी. |
चंदगड : प्रतिनिधी
प्रत्येक मुलाला वाटत असते आपला वाढदिवस अगदी थाटामाटात साजरा व्हावा. सर्वांना चॉकलेट वाटावी. पण वर्गात चॉकलेट खाऊन प्लॅस्टिक कागद फेकले जातात व कचरा करतात. चॉकलेटचा आरोग्यावर विशेषतः दातांवर परिणाम होतो. दात किडतात. ही बाब लक्षात येताच चंदगड येथील दि न्यू इंग्लिश ग्रंथपाल शरद हदगल यांनी प्राचार्य आर.आय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चॉकलेट नको पुस्तक हवे हा उपक्रम राबवला. ज्या विद्यार्थ्याचा वाढदिवस असेल त्यांनी आपल्या ग्रंथालयाला पुस्तक भेट दयावे असे आवाहन ग्रंथपाल हदगल यांनी केले.
या उपक्रमास उत्स्फुत प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्याच्यांत वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. आतापर्यंत ग्रंथालयात ५० पुस्तके जमा झाली आहेत. कु. निर्झरा उध्दव गवस, कु. पियुषा उध्दव गवस, श्रावणी पाटील, मंदार गायकवाड, प्रा. दुष्यंत शिंदे, महादेव पवार, निखिल वाके आदि विद्यार्थ्यानी ग्रंथालयाला पुस्तके भेट दिली. उपप्राचार्य ए. जी. बोकडे, पर्यवेक्षक एस. जी. सातवणेकर, एम. एल. कांबळे, एन. डी. देवळे, टी. एस. चांदेकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment