जिल्हा बदलीने आलेल्या प्राथमिक शिक्षकांवर अन्याय, आमदार राजेश पाटील यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2021

जिल्हा बदलीने आलेल्या प्राथमिक शिक्षकांवर अन्याय, आमदार राजेश पाटील यांना निवेदन

जिल्हा बदलीने आलेल्या अन्यायग्रस्त शिक्षकांच्या वतीने आमदार राजेश पाटील यांना निवेदन देताना शिक्षक व संघटना पदाधिकारी

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

      शासनाच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून जिल्ह्यात आलेल्या चंदगड तालुक्यातील अन्यायग्रस्त शिक्षकांनी आमदार राजेश पाटील यांची भेट घेऊन अन्याय निवारणासाठी निवेदन दिले.

        गावापासून दूर परजिल्ह्यात शेकडो किलोमीटर दुर्गम भागात दहा- वीस वर्षे काम करून विनंती ने स्व-जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांवर अन्याय सुरूच आहे. स्व-जिल्ह्यात आले तरी स्वतःच्या तालुक्यात तालुक्यातील शाळा मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे 'आगीतून फुफाट्यात अशी गत आहे.' बदलीने आल्यानंतर सुरुवातीला नोकरी लागलेली सेवाजेष्ठता तारीख खंडित होऊन नवीन जिल्ह्यातील तारीख धरली जाते. परिणामी ऑनलाइन बदली प्रक्रियेत ते जुनियर ठरुन परतालुक्यात जावे लागते. बदलीसाठी पोस्टिंग देताना तरी निदान जुनी तारीख ग्राह्य धरावी. अशा आशयाचे निवेदन अन्यायग्रस्त शिक्षकांच्या वतीने आमदार राजेश पाटील यांना देण्यात आले. यावेळी शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी दस्तगीर उस्ताद, प्रशांत पाटील, बाळाराम नाईक, महादेव सांबरेकर, टी. जे .पाटील, महादेव भरणकर, सागर मोरे, सदानंद पाटील, प्रकाश पाटील, विलास पाटील यांच्यासह शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश हुद्दार, शिक्षक बँक संचालक शिवाजी पाटील, भरमू तारीहाळकर, अशोक नौकुडकर आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment