काजिर्णेत तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2021

काजिर्णेत तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू

दिनानाथ कांबळे

चंदगड / प्रतिनिधी

          मित्रांसोबत काजिर्णे (ता. चंदगड) येथील धरणावर फिरायला गेले असताना धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. दिनानाथ सुरेश कांबळे (वय-२१, चंद्रसेन गल्ली, चंदगड) असे मृत युवकाचे नाव आहे. १४ मार्च दुपारी तीन ते १५ मार्च २०२१ रोजी सकाळी आठच्या दरम्यान हा ही घटना घडली. गजानन कांबळे (रा. सुळगा, ता. जि. बेळगाव) यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली आहे.

            याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी - दिनानाथ कांबळे हा आपल्या मित्रांसोबत चंदगड शहरापासून काही अंतरावर असलेल्या काजिर्णे धरणावर फिरण्यासाठी गेला होता. तिथे गेल्यानंतर धरणाच्या पाण्यामध्ये पोहत असताना धरणाच्या  खोल  पाण्याचा अंदाज आला नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी तीन वाजता तो बुडाल्याचे समजले. त्यावेळी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती.आज सोमवारी सकाळी पुन्हा शोध घेतला असता सकाळी आठ वाजता त्याचे प्रेत धरणाच्या पाण्यात मिळून आले. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पोलीस नाईक श्री. शिंदे तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment